Tuesday, December 29, 2020
Saturday, October 3, 2020
||श्रीं||
"काहे को रोना ?"
ह्या आठवड्यात अनेक आत्महत्येच्या व आत्महत्येच्या प्रयत्नाच्या बातम्या अधिक दिसत होत्या. त्याचे कारण बघायला गेले तर आपल्या आजू बाजूला असलेली नाकारात्मकता ..
सगळी वाट लागलीये .. मंदी आलीये .. इत्यादि इत्यादि ..
हे सगळे बहुतांशी खरे असले तरी अगदीच जीवन संपवण्या इतके जीवनात काहीही वाईट नसते. भगवंत कधीही फाटेल एवढे ताणत नाही हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे ..
अश्या वेळी आपल्या आजूबाजूला अधिकाधिक सकारात्मकता पसरवणे आपले कर्तव्य आहे. हीच थीम लक्षात
खरं म्हणजे कोरोना ने आपल्या सर्वांच्याच जीवनाला एकप्रकरे ब्रेक दिलाय ..
त्याचा अधिकाधिक उपयोग करुन घेऊन अनेक जणांनी अनेक नव्या वाटा चोखाळल्यात..
त्या सर्व सकारात्मकतेचा समन्वय म्हणजे "को रोंना?"
तरी आपण स्वत: व आपल्या आजूबाजूचे असे कोणी असतील ज्यांनी ह्या कोरोंना काळात आज पर्यन्त नवे अनुभव नव्या सकारात्मक गोष्टी घडल्या असतील.. जाणीव पूर्वक चोखाळलेल्या असतील ..
त्या सर्वांच्या व्हिडिओ चे आपण ह्या स्पर्धेत सहभागी करुन घेत आहोत ..
तर ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण पुढील लिंक वर नीयम व अटी वाचून आपली माहिती भरुन पाठवावी ..
स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे असतीलच ..
पण ती बक्षिसे तुमच्या भविष्यातील सकारात्मकता वाढवणारी नक्कीच असतील ..
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfhferFJD6opxcBy4MfLxynrU1TfZkcReI0o29vith__uEXJg/viewform?usp=pp_url
Wednesday, January 15, 2020
"आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणे कठीण आहे... आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. नदीनाले उतरुन जाण्यास वाट नाही. अमिरूलउमराव शाएस्तेखान आमच्या या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहचणाऱ्या खोऱ्यात तीन वर्षे खपत होता .. "
ह्या शिवप्रभूंच्या वाक्याचा प्रत्यक्ष प्रत्यय ह्या वर्षीच्या मोहिमेत येत होता आणि शाएस्तेखान तीन वर्षे खपत होता म्हणजे नक्की काय करत होता ? ह्याचा अनुभव प्रत्येकालाच आला. कितीही बिकट प्रसंग आला तरी सुद्धा गुरुजी सुद्धा ह्याच मार्गावरून चालताहेत ह्या वाक्याने तर स्वतः स्वाभिमान व पौरुषाला आव्हान दिल्या सारखे वाटत होते.
ह्या वर्षी सर्व ठाणेकर अत्यंत जवाबदारीने वागले. आमचा खजिना मागे राहिला होता पण त्याची काळजी नव्हती ... पण, स्वप्निल राव दानवाले व त्यांनी आणलेल्या बछड्यांची खूप काळजी वाटत होती...वाटेत चालताना फाटाफूट झाली कोणी मागे राहिले तरी सुद्धा शेवटी समारोपाला सर्व एकत्र भेटले .. ज्याचा शेवट चांगला त्याचे सर्वच चांगले ह्याचा प्रत्यय आला.
अध्यात्म असो वा व्यवसाय; जगातील कोणतेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात आपले शिवपाईक धारकरी काळालाही आव्हान देऊन लढत लढत यशस्वी होणारे धारकरी भेटत होते आणि त्यामागे जी स्फुर्तीप्रेरणा होती ती म्हणजे श्री शिवाजी .. श्री सह्याद्री .. व श्री गुरुजी ...
बहुत काय लिहू ...
माझ्या अतिकोमल व मृदू वाणीने कोणाला फायदा झाला असेल तर धन्यवाद म्हणण्याची आवश्यकता नाही पण दुखावला असाल तर नक्कीच सांगा ...