Wednesday, January 23, 2019

म्हणून आम्ही शिवसैनिक !

         हिंदूहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, इत्यादी अनेक उपाध्या आज पर्यंत बाळासाहेब ह्या नावाची शोभा वाढवत दरारा निर्माण करत राहिल्या ...
         पण त्यांचे कर्तुत्व ह्या सगळ्या उपाध्यांपेक्षा मोठ्ठ होत ... 
         खरं म्हणजे ते आमच्या सारख्या जन्मजात शिवसैनिकांच्या लक्षात आले नव्हते ... 
पण एकदा आमचे भाग्य उजळले; पु.श्री. संभाजीराव भिडे गुरुजी घरी आले आणि बोलता बोलता घरातील बाळासाहेबांच्या प्रतिमेकडे बोट दाखवून बोलले.... 
        "ह्या महापुरुषाने श्री शिवछत्रपतींच्या दोनपताकांच्या भगव्या ध्वजाला; १८१८ नंतर पुन्हा एकदा राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठा आपल्या कार्य कर्तुत्वाने प्राप्त करुन दिली ..."
          खरं सांगा, ह्या आधी हा असा विचार कोणी केला होता ?
१८१८ ला मराठ्यांचे साम्राज्य बुडाले, भगवा ध्वज उतरला, ब्रिटीशांचा झेंडा फडकला ... 
१४ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले पण तेंव्हा व त्यानंतर कधीही भगव्या ध्वजाला ती अस्मिता, ती प्रतिष्ठा पुन्हा मिळाली नाही ...  
         ती प्रतिष्ठा ह्या महापुरुषाने मिळवून दिली ... 
         खोटं वाटतय .... 
          
          "शिवसेना" ह्या पक्षाशिवाय कुठल्याही पक्षाचा विजय झाल्यावर "भगवा फडकला" असे म्हंटले गेले का ?
त्या आधीचा प्रत्येक विजय हा कुठल्या तरी पक्षाचा होता ... 
सेनेचा विजय हा "भगव्याचा" होता ....
पक्षाचे नेतृत्व बदलेल, कार्यपद्धत बदलेल पण शिवसैनिकांची भगव्या प्रतीची निष्ठा व देव-देश-धर्मापायी काहीही करण्याची वृत्ती सदैव वज्रप्राय असेल ...  
       
          कारण, आम्ही खरंच भाग्यवान आहोत ...
          ह्या डोळ्यांनी बाळासाहेबांसारखे तेजस्वी व्यक्तिमत्व आम्ही पाहू शकलो; अनुभवू शकलो ... 
          आणि पु.श्री. संभाजीराव भिडे गुरुजीं सारखा श्री शिवछत्रपतींचा दृष्टीकोन असलेला द्रष्टा-लोकोत्तर गुरु व मार्गदर्शक ... 

No comments:

Post a Comment