Monday, August 19, 2019

उदंड जाहले पाणी ..

||श्रीं||
खर सांगायच तर उजव्या हाताने केलेल्या मदती बाबत डाव्या हाताला सुद्धा कालू देऊ नये असे शास्त्र सांगते. परंतु मी जे सांगतोय ते केवळ आम्ही केलेल्या कर्तव्याची पूर्तता म्हणून सांगत आहे.
आजची तिथली स्थिति व त्याही परिस्थितीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ठाणे-मुंबई-पालघर-नवीमुंबई विभागा मार्फतच नाही तर महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरून सुद्धा जी काही कर्तव्यपुर्ती विविध मार्गाने पूरग्रस्त भागात पोहचते आहे; त्याचे स्वरूप ज्या विविध सेवाभावी संस्था मदत म्हणून पूरग्रस्त भागात पोहचत आहेत त्यांना ह्या अनुभवाचा उपयोग व्हावा म्हणून हा प्रपंच ..
कराड पासून गाडी पुढे जायला लागताच पुराचे व्रण सहज दिसायला सुरू होतात. जशी-जशी सांगली जवळ यायला लागते तशी हवेतील दुर्गंधी आपल्याला अस्वस्थ करायला सुरुवात करते. बॅनर-हॉर्डिंग-भिंती यांवरून पुर रेषा कुठवर आली होती ते सहज लक्षात येत होत. वाटेत अवचित पणे नितीन दादा वाटेतच भेटल्याने शोधाशोध न करता ठरलेल्या संकलन केंद्राच्या ठिकाणी आमची गाडी पोहचली. त्यावेळी एका गावासाठी संच (जीवनावश्यक वस्तूंचा सेट) गाडीत भरायचे काम चालू होते. आम्ही सुद्धा दुपारी दोन अडीच वाजता पोहचल्याने तिथल्या कार्यरत धारकऱ्यांनी आम्हां सर्वांनाच हातपाय धुवून पहिले जेवण करून घ्यायचा आग्रह केला. आणि गंमत म्हणजे आम्ही हातपाय धुवून येई पर्यन्त ज्यांच्या दर्शना साठी आम्ही असुसलेलो होतो ते गुरुजीच संकलन केंद्रावर आले. तसे आम्ही जेवणा कडे न वळता गुरुजींच्या दर्शनासाठी धावलो..
बघतो तर गुरुजी भरत असलेल्या गाडी बद्दल चौकशी करत होते. ज्या गावात चाललेय त्या गावाचे नाव सांगताच त्या गावात एवढेच का पाठवताय ? तिथे अधिक संच हवे होते ना ? इत्यादि बाबी गुरुजी विचारत होते. ४०० संच आवश्यक असलेल्या गावात केवळ वाहन व्यवस्था नसल्याने आणलेल्या गाडीत १५० संच भरता येत होते. गुरुजींनी स्वत: सूचना देऊन संच गाडीत आजून व्यवस्थित पणे लावायला लाऊन ५० अधिक संच भरायला लावले. पान गुरुजींच्या डोळ्या समोर उद्विग्नता होती उरलेल्या २०० कुटुंबांबद्दल ..
खरं सांगू का ? खोटे आरोप होवून सुद्धा उद्विग्न न होणाऱ्या गुरुजींना त्यादिवशी आम्ही उद्विग्न बघितले. कारण ? कारण हे तसेच होते .. कारण ४०० हा आकडा छोटा असला तरी तो कुटुंबांचा असल्याने त्याचा व्याप मोठा आहे. किमान १५०० माणसांचा प्रश्न आहे. आणि दिलेला आकडा हा सरकारी अथवा राजकीय नसून प्रत्यक्ष आपल्या धारकऱ्यांनी जाऊन तपासून मग निर्धारित केलेला असल्याने त्यातील तथ्यांश १००% इतका आहे..
प्रत्येक गावासाठी स्थानिक धारकऱ्यांसह एक जवाबदार धारकरी नेमून दिला आहे. गाव मोठ असेल तर आधी धारकरी गावत जाऊन स्वत: तपासणी करून गरजवंत बांधवांची नावे लिहून घेतात व लगेचच त्या संख्ये मधील संच संबंधित गावात पाठवले जातात ..
छोटे गांव/वस्ती असेल तर संचाची गाडी बाहेर ठेऊन आधी जवाबदार व स्थानिक धारकरी वस्तीवर जातात. निरीक्षण करतात.. आणि गरजवंतांना एक टोकन देऊन गाडी जवळ पाठवतात व गाडी जवळ टोकन घेऊन आलेल्या बांधवांचे नाव ब संपर्क क्रमांक टिपून घेऊन संच व इतर साहित्य दिले जात होते.
अनेक वेळेला ग्रामपंचायती कडून "इथे देऊन जा.. आम्ही वाटू .. " म्हणून कडक आग्रह केला जायचा पान गुरुजींनी पाठवलेली शिदोरी आहे हे सांगताच मार्ग मोकळा व्हायचा..
पण ही सर्व नियोजनबद्ध काटेकोर शिस्त लावण्याचे कारण काय ? तर मानवी स्वभाव.
दोष आपल्या मतदारांना / जातभाईंना / कुटुंबीयांना पहिले मदत मिळावी ह्यात नसून सर्वांसाठी आलेली मदत ही केवळ आपल्या मतदारांना / जातभाईंना / कुटुंबीयांनाच मिळावी ह्या अप्पलपोटे पणात आहे.
आणि सर्वात महत्वाचे मला अभिमान आहे आजही अश्या खरंच वंचित व गरजवंता पर्यन्त शासनाच्या मदती आधी धर्म,जाति, पक्ष, पंथ इत्यादि सर्व भेदांना बाजूला ठेऊन केवळ माणूस म्हणून जाणारी पहिली शिदोरी ही "गुरुजींची" आहे ..
नितीनदादा चौगुले, अमितदादा करमुसे ह्यांच्या नेतृत्वाखालील २ केंद्रे बघण्याचा योग आला आणि द्यायला गेलेले हात शिदोरी घेऊन परत आले ..
ह्या शिदोरीसाठी माझ्या ज्या मित्रांनी ह्यात मनापासून तन-मन-धनाने सहयोग केला त्या सर्वांचा मी ऋणी आहेच पण ज्यांनी माझी आवश्यकता असताना माझी अनुपस्थिती सहन केली त्या सर्व अशील(मराठीत क्लाइंट), कुटुंबीय व गणेशोत्सव मंडळातील सहकारी ह्यांचे ही ऋण मी मान्य करतो ..
पण लढाई आजून बाकी आहे 

No comments:

Post a Comment