Friday, September 13, 2019

माझं जंगल ..

 ||ह्रीं||


खरं म्हणजे मी माझ्या आवाक्या बाहेरील गोष्टींवर फार जास्त विचार करत नाही. आणि आवाक्यात असलेली गोष्ट बदलल्या शिवाय राहत ही नाही. पण गेल्या काही दिवसां पासून (आरे व अमेझोन प्रकरण झाल्या पासून) एक गोष्ट सतत मनात येतेय ती म्हणजे अशी की, मुंबई जवळ आपलं स्वतःच सदाहरित जंगल असावं.. 

माझं जंगल .. 

कधी तरी गाडी काढून एकांतात जावं.. 
पाखरांची किलबिल ऐकावी .. 
एखाद्या खोपटात शिरून झुणका भाकरी खावी .. 
खरं मिनरल पाणी प्यावं .. 
आणि झाडाखाली ताणून द्यावं .. 

पण हे उभं करायला १० वर्ष ताप असतो .. नंतर पुढे त्याचं ते वाढतं .. 
व त्याच्या व्यवस्थापन व व्यवस्थेचं नियोजन त्याचं तेच करत .. 

जागा जरी फुकट मिळाली तरी सुद्धा प्रति वर्षी साधारणत: ५ रु./चौ.फु. इतका खर्च येतो. 

प्रत्येक वर्षांची रक्कम त्या वर्षी जमा करायचं म्हंटल तर त्याचा व्यवस्थापन खर्च अधिक होतो. १० वर्षांचा खर्च हा एकत्र घेतला तरच  महागाईचा दर व इतर संलग्न कामं करुन जुळणा करता येऊ शकेल.. 

तरी ज्या पर्यावरण प्रेमींना माझ्या सारखेच आपलं जंगल असावं असं वाटत त्यांनी नक्कीच ह्या चळवळीत सहभाग घ्यावा ... 

जंगल आपलंच असेल .. 
पण आपण राखलं तर .. 

कदाचित माझी हीच खरी पुढच्या पिढीला दिलेली शिदोरी असेल ... 
व वाट ही असेल पितृऋणातून मुक्त होण्याची .. 

सहभागा साठी पुढील लिंक वर आपली पूर्ण माहिती भरा .. 

ऍड. चेतन विश्वनाथ बारस्कर 
९८३३९९९११४

लिंक :- 
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPvV1gP8quxwYz90IKVWdCfuWU9SYs5J787S2_L9biVsglrw/viewform


(दिलेल्या ईमेल वर प्रत्येक ३ महिन्यांनी तपशीलवार अहवाल पाठवला जाईल)

Thursday, September 12, 2019

||ह्रीं||

काय संबंध आहे अवकाश यान व भारतीय कलागणणेचा ..?
खरंच एकादशी व अंतराळ मोहिमेचा काही संबंध आहे का.. ?
काय आहे वैज्ञानिकांनी स्थापित केलेले ऐतिहासिक सत्य .. ?

दुसऱ्या महायुद्धा नंतर मित्र राष्ट्रांपैकी अमेरिका व सोव्हिएत रशिया ह्यांच्यात शीत युद्ध सुरु झाले. समाजवादी व भांडवलशाही राष्ट्र ह्यात अवघे विश्व वाटले जाते की काय ? अशी परिस्थिति होती. वेगवेगळ्या राष्ट्रांना आपल्या बाजूला करण्या पासून ते आर्थिक व राजकीय सत्तान्तरणे घडवून आणणे येथे सुरु झालेले हे युद्ध शस्त्रास्त्र संशोधना पासून अवकाश संशोधना पर्यन्त आले ..



१९५१ साली अमेरिकेने एरोबी रॉकेटात एक माकड व अकरा उंदीर सु. ७२ किमी. उंचीपर्यंत यशस्वी रीतीने पाठविले होते. त्यानंतर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय  वर्षातील अध्ययनात वापरण्यासाठी कृत्रिम उपग्रह तयार करण्याचा प्रकल्प १९५५ साली तयार करण्यात आला. 
पण तो प्रत्यक्ष कार्यवाहीत येण्यापूर्वीच एक अलौकिक घटना घडली सोव्हिएत रशियाने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी Baikonur (आत्ताचे कझाकीस्थान मधील ठिकाण) येथून स्पुटनिक-१ हा पृथ्वीचा पहिला कृत्रिम उपग्रह यशस्वी रीत्या कक्षेत सोडून अवकाशविज्ञानाच्या एका नवीन पर्वास प्रारंभ केला. 

अमेरिकेने आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी लगेच प्रयत्न सुरु केले. अनेक अपयशी अवकाश मोहिमा नंतर दिनांक ३१ जानेवारी १९५८ रोजी अमेरिकेने एक्स्प्‍लोअरर-१ हा आपला पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडला. त्या उपग्रहामुळे व्हॅन ॲलन प्रारणपट्ट्यांचा (पृथ्वीभोवतील उच्च ऊर्जेच्या कणांनी युक्त असलेल्या व व्हॅन ॲलन यांनी शोधून काढलेल्या भागाचा) शोध लागला.


त्यानंतर मानवी महशक्तींची नजर आकाशात भिरभिरणाऱ्या चंद्राकडे गेली. चंद्र सुद्धा ह्या महासत्तांच्या शीतयुद्धात ओढला गेला.. अनेक अयशस्वी उड्डाणानंतर सोव्हिएत रशियाने दिनांक १३ सप्टेंबर १९५९ (मॉस्को च्या वेळे प्रमाणे, अमेरिकेच्या वेळे प्रमाणे १२ सप्टेंबर १९५९) रोजी घोषणा केली की, त्यांनी ‎Baikonur येथून लुना २ ह्या अंतराळ यान यशस्वी रित्या चंद्रावर उतरवले असून ते चंद्रावर जाणारे पहिले मानव निर्मित यान आहे. 


खरं तर ह्या तीनही घटना अंतराळ व अवकाश ह्यांच्या बाबतीत घडलेल्या मानवी इतिहासातील पहिल्या मानव निर्मित अलौकिक घटना आहेत पण त्या सर्वांच्यात एक साम्य आहे ज्याचा आपल्याला अभिमान अभिमान वाटला पाहिजे .. 

ते म्हणजे ह्या सर्व घटना घडल्या त्या दिवशी तिथी होती .. 
शुक्ल पक्षातील एकादशी 

काय सिद्ध होतं ? ह्या अवकाश मोहिमांच्या यशस्वीते मागे लपलेल्या तिथी मुळे .. 
की भारतीय कलागणणेचा वापर हे दोन महासत्तांनी एकमेकांपासून लपवलेल टॉप सीक्रेट होत ?