||ह्रीं||
(दिलेल्या ईमेल वर प्रत्येक ३ महिन्यांनी तपशीलवार अहवाल पाठवला जाईल)
खरं म्हणजे मी माझ्या आवाक्या बाहेरील गोष्टींवर फार जास्त विचार करत नाही. आणि आवाक्यात असलेली गोष्ट बदलल्या शिवाय राहत ही नाही. पण गेल्या काही दिवसां पासून (आरे व अमेझोन प्रकरण झाल्या पासून) एक गोष्ट सतत मनात येतेय ती म्हणजे अशी की, मुंबई जवळ आपलं स्वतःच सदाहरित जंगल असावं..
माझं जंगल ..
कधी तरी गाडी काढून एकांतात जावं..
पाखरांची किलबिल ऐकावी ..
एखाद्या खोपटात शिरून झुणका भाकरी खावी ..
खरं मिनरल पाणी प्यावं ..
आणि झाडाखाली ताणून द्यावं ..
पण हे उभं करायला १० वर्ष ताप असतो .. नंतर पुढे त्याचं ते वाढतं ..
व त्याच्या व्यवस्थापन व व्यवस्थेचं नियोजन त्याचं तेच करत ..
जागा जरी फुकट मिळाली तरी सुद्धा प्रति वर्षी साधारणत: ५ रु./चौ.फु. इतका खर्च येतो.
प्रत्येक वर्षांची रक्कम त्या वर्षी जमा करायचं म्हंटल तर त्याचा व्यवस्थापन खर्च अधिक होतो. १० वर्षांचा खर्च हा एकत्र घेतला तरच महागाईचा दर व इतर संलग्न कामं करुन जुळणा करता येऊ शकेल..
तरी ज्या पर्यावरण प्रेमींना माझ्या सारखेच आपलं जंगल असावं असं वाटत त्यांनी नक्कीच ह्या चळवळीत सहभाग घ्यावा ...
जंगल आपलंच असेल ..
पण आपण राखलं तर ..
कदाचित माझी हीच खरी पुढच्या पिढीला दिलेली शिदोरी असेल ...
व वाट ही असेल पितृऋणातून मुक्त होण्याची ..
सहभागा साठी पुढील लिंक वर आपली पूर्ण माहिती भरा ..
ऍड. चेतन विश्वनाथ बारस्कर
९८३३९९९११४
लिंक :-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPvV1gP8quxwYz90IKVWdCfuWU9SYs5J787S2_L9biVsglrw/viewform
(दिलेल्या ईमेल वर प्रत्येक ३ महिन्यांनी तपशीलवार अहवाल पाठवला जाईल)
No comments:
Post a Comment