Saturday, December 7, 2019

श्रीमत् भगवत् गीता व श्री शिवछत्रपती संबंध

आज गीता जयंती,

आजच्याच दिवशी भगवंतांनी पूर्ण मानव जातीला मार्गदर्शन करणारी श्रीमत् भगवत् गीता कुरुक्षेत्रच्या रणमैदानावर सांगितली ....
प्रबोधनकार काय म्हणतायेत ते पाहूयात गीता-छत्रपती श्री शिवाजीमहाराज ह्यांच्या संबंधांवर ....

"हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतःचा प्राण देणे अथवा अफझुलखानाचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्गच शिवाजीपुढे नव्हता. अर्थात ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून, `योगः कर्मसुकौशलम्’ या गीतोक्तीप्रमाणे राजकारणी दगलबाजांतील योगीराज ही आपली कीर्ती जगजाहीर केली. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिप्रभावाने रंगवून चिरंजीव करणा-या दगलबाज श्रीकृष्णाला अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यांत मुळीच संशय नाही. अर्थात
``यत्न योगेश्वर: कृष्णः’’ हा श्लोक या पुढे –
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र शिवराय भूपति ।।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।
असाच वाचला पाहिजे, बोला – दगलबाज शिवाजीचा जयजयकार!!
प्रबोधनकार ठाकरे
--- दगलबाज शिवाजी
--- पान क्र.१३

चला आपणही श्रीमत् भगवत् गीता व श्री शिवप्रभूंच्या मार्गाचे अनुनयन करण्याचा संकल्प श्री गीताजयंतीच्या दिवशी घेऊयात ....

No comments:

Post a Comment