Wednesday, December 18, 2019

खरं सांगतो बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात ..

खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

तुमची असलेली बिरुदावली
आम्ही आमचीच समजत होतो
सेना आमचीच सेनापती
तुम्हां शिवाय मानत नव्हतो ..
हिंदू मनाचा सम्राट जेव्हा
चवी पुरते वंदनीय होतात ..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

ते ही आम्ही सहन केले
हे ही आम्ही सहन करु ?
स्वातंत्र्यसूर्यावर थुंकेल पप्पू
आम्ही त्याची पिंक धरू?
गांडु की मर्द म्हणून ..
जगा, असे बोलला होतात
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

चला नवा संसार आहे ..
ते ही आम्ही समजून घेऊ
दुधा सोबत शेळीच्या
दोन लेंडया ही पिऊन घेऊ ..
दगडाखाली हात जयाचा
त्याची वाचा तुम्हीच होतात..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

जमिया आणि जालियनवाला
तुलना करावी कुणी कशी ?
काय बोलतील ? अमर हुतात्मे
जरी भेटतील स्वर्गासी ..
इतिहासाचा पाठ नवा
इटली छाप करु म्हणतात ..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

आजूनही वेळ गेली नाही
मान्य ही सर्व समीकरणे
तरीही योग्य वेळी बोलावे
नाहीतर मौन बरे धरणे
खूप आहे लिहाण्या सारखे
गुज जाणणारे तुम्हीच होतात ..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

अधिवक्ता चेतन विश्वनाथ बारस्कर
१८/१२/२०१९ 

No comments:

Post a Comment