||श्रीं||
अग्नीमाजीं गेलें। तें अग्निरुप होऊनि ठेलें।।
काय उरलें तयां पण। मागील तें नामगुण।।
सरिता ओढा ओहोळा। गंगे मिळोनि झाल्या गंगा।।
चंदनाचे वासें। तरु चंदन झाले स्पर्शे।।
लोह जडतां परिसा अंगीं। तो ही भूषण झाला जगीं।।
तुका जडला संतांपायी। दुजेपणा ठाव नाही।।
अग्नीमाजीं गेलें। तें अग्निरुप होऊनि ठेलें।।
काय उरलें तयां पण। मागील तें नामगुण।।
सरिता ओढा ओहोळा। गंगे मिळोनि झाल्या गंगा।।
चंदनाचे वासें। तरु चंदन झाले स्पर्शे।।
लोह जडतां परिसा अंगीं। तो ही भूषण झाला जगीं।।
तुका जडला संतांपायी। दुजेपणा ठाव नाही।।
जे आगीत जातं ते पेटून अग्नी रुपंच होऊन जातं, त्याचे मागचे गुणधर्म नावाला सुद्धा शिल्लक राहत नाहीत. मोठी नदी असो, एखादा ओढा अथवा ओहोळ असो ते जर का गंगेस मिळाले की त्याचे नदीपण, ओढा अथवा ओहळ पण शिल्लक राहत नाही ते गंगाच होऊन जातात. चंदनाचा सुवास ज्या झाडा सोबत वाढते त्या झाडाला ही लागते. लोखंड परिसाचा क्षणार्धाचा स्पर्श लोखंडाचे मोल बदलून टाकते. त्याच प्रमाणे संताच्या पायी लागल्यावर सुद्धा संतत्व प्राप्त करुन देण्याची किमया होते असे तुकोबा सांगतात ..
त्याच प्रमाणे श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या उपक्रमात सहभागी झाल्यावर श्री शिव-शंभू छत्रपतींच्या अंत:करणाचा ठाव आपल्याला कळतो. मात्र त्यातील विशेषार्थाने मोहीम हा उपक्रम इतका विशेष आहे की वर्षभर आपण केलेले उपक्रम म्हणजे शाळेत/महाविद्यालयात रोज दिलेली उपस्थिती व मोहिम म्हणजे वार्षिक परीक्षा. वार्षिक परीक्षेत न बसता; वर्षभर वर्गात बसला म्हणून कोणी उत्तीर्ण करत नाही. परंतु काही अपरिहार्य कारणाने वर्गात बसू न शकलेला विद्यार्थी पण वार्षिक परीक्षेत बसून उत्तीर्ण होऊ शकतो.
त्याच प्रमाणे श्री शिव-शंभूंच्या विचारांचे पाईक होण्याची पात्रता आपल्यात आहे का नाही ? हे तपासणी केंद्र म्हणजे मोहीम.
ह्यात उत्तीर्ण झालो म्हणजे पात्रता आपल्यात आहे. आहोत की नाही हे पुढच्या वर्षभरात आपण जगून दाखवायचं असतं.
आज श्री शिव शंभूंच्या नावाने संघटनात्मक काम करणाऱ्या अनेक संस्था संघटना उत्तम सामाजिक व संघटनात्मक कार्य करत आहेत व ह्या महाराष्ट्रात दिवसा गणिक नव्याने ही उघडत असतात. पण श्री शिव शंभू हे सामाजिक विषय नसून वैयक्तिक आचरणाचे मानबिंदू आहेत. तसे आपण जगले-वागले पाहिजेत असे सांगणारी श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान ही एकमेव संघटना आहे. आणि आपल्या भाग्याने ज्यांच्या मार्गदर्शना खाली आपण चालतो ते गुरुजी हे तसे जीवन जगून आपल्या समोर असलेले जिवंत आदर्श आहेत. नाहीतर रोज सूर्यनमस्कार घाला असे सांगणारे अनेक ढालगंज किंवा बुळबुळीत दंडाचे गुरु आपण बघतोच.
म्हणून आपण विशेष भाग्यवान आहोत. ना कोणाचा द्वेष; ना राग; केवळ आग्रह; आपण हिंदू म्हणून असण्याचा ...!
हिंदू म्हणून जगण्याचा..!
No comments:
Post a Comment