दरवेळी पाकिस्तानने असे काही केले की, आपण युद्ध करुन त्याला संपवण्याची भाषा करतो व आपली राष्ट्रभक्ती दाखवतो ! भावनिकतेने बघितल्यास ते योग्यच आहे पण वस्तुस्थिती तशी नाही ....
जाहीर युद्धाने पाकला संपवणे ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी
आज आपण संयुक्त राष्ट्र संघाचे जवाबदार सदस्य असल्याने आपण जाहीर युद्धाने पाकिस्तानशी लढू शकत नाही. आपणच काय ? पण अमेरिके सारखे सामर्थ्यामुळे कोणालाही जवाब देण्यास बांधील नाही अश्या समजुतीत असलेले बेजवाबदार राष्ट्र सुद्धा एखाद्या राष्ट्रा विरोधात युद्ध करुन त्याचा भौगोलिक भाग आपल्या राष्ट्राचा भाग करु शकत नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे...
आणि तसे करणे म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची घंटा आहे. कारण झालेले युद्ध हे केवळ पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान असे होणार नाही. चीन विरुद्ध हिंदुस्थान असे होईल. आज भीक घालण्याची ही लायकी नसलेले पाकिस्तान हे केवळ चीनच्या पाठिंब्या मुळेच हिंदुस्थानला डिचवण्याची हिम्मत करत आहे. आणि केवळ चीनला अद्दल घडावी म्ह्णून हिंदुस्थानला पुढे करुन व्यापारात प्रस्थापित राष्ट्र विरुद्ध पाकिस्तान व चीन असा हा सामना रंगण्याची शक्यता अधिक आहे.
जर हा प्रश्न काश्मीर पर्यंतच सीमित राहिला तर ...?
दोन्ही देशांना न परवडणारे युद्ध टाळता येईल. पाकिस्तान कडे गमावण्या सारखे काही नसल्याने चीन ने टाकलेले तुकडे ही त्यांच्या साठी बोनसच आहेत परंतु, भारता कडून पूर्ण काश्मिर अथवा पाक व चीन व्याप्त काश्मीर आहे तसे राखण्यात यश आले तर त्याचा परिणाम चीनला खूप फायद्याचा आहे. कारण चीन व पाकिस्तानचे संबंध कितीही छान असले व त्यांची सीमा एकमेकांना लागून नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या युद्धाचे चीनच्या बाजूने जर काही कारण असेल तर ते तेल आहे. अमेरिकेने पाकिस्तानचे लाड करणे कमी केल्याने आता त्यांना चीनला आपले बाप बनवण्या शिवाय गत्यंतर नाही. हे पुढील चित्रांतून स्पष्ट होईल.
ह्या चित्रात आपण पुस्तकात काहीही नकाशा बघत असलो तरी वस्तुस्थितीचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. पाकिस्तानला चीनशी भौगोलिक दृष्ट्या जोडलेले राहण्यासाठी पाकव्याप्त काश्मीर हे एकमेव माध्यम असल्याने तो पट्टा अबाधित राहणे चीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण चीनचा समुद्र मार्गे होणारा व्यापार व मुख्यत्वे त्याला लागणारी ८०% खनिज तेलाची वाहतूक ही मलाक्काच्या समुद्रधुनीतून होते. तिचे भौगोलिकस्थान आपण पुढील चित्रात पाहू ....
भौगोलिक दृष्ट्या हिंदुस्थान कधीही चीनच्या आयातीच्या सर्व नाड्या कधीही आवळू शकतो. त्यामुळे ह्या कोंडीतून सुटण्यासाठी एखादा दुसरा मार्ग असणे चीनच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे .... आणि त्याचाच परिपाक म्हणजे China Pakistan Economic Corridor (C-PEC) ला ’सीपेक’ या संक्षिप्त नांवाने ओळखले जाते. तो चीन मधील काशगर येथून सुरु होतो, तो थेट पाक व्याप्त काश्मीर मधून ३००० किलोमीटरचा प्रवास करीत पाकिस्तानच्या बलुचिस्तान मधील ग्वादर या बंदरात जाऊन पोहोचतो. तो असा....

त्यामुळे हा दिसत हिरवा असलेला साप आपण गेल्या ७० वर्षांत हरवलेला साप नसून आता तो ड्रॅगन झालाय...
त्याच्या महत्वाकांक्षा ड्रॅगनच्या असल्या तरी त्या साध्य करण्याची ताकद आजही त्याच्या हिरव्या रंगात आहे.
कशी ते पुढच्या भागात ....
उत्तम भौगोलीक माहिती.…
ReplyDeleteधन्यवाद ..
Delete